इचलकरंजी शहराचे माजी नगरसेवक रवींद्र माने लवकरच दिली जाणार मोठी जबाबदारी, मिळणार लाल दिव्याची गाडी….

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलताना सर्वानीच पहिले. अनेक पक्षप्रवेश पहायला मिळाले. इचलकरंजी शहरातील माजी नगरसेवक इचलकरंजी शहरातले माजी नगरसेवक आणि शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी मोठे योगदान दिलेले होते. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेला होता एकनाथ शिंदे यांनी रवींद्र माने यांचे पुनर्वसन केलं जाईल अस आश्वासन दिले होते.

या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे खाजगी मध्ये बैठक घेऊन रवींद्र माने यांचे पुनर्वसन होईल त्यांच्यावर लवकरच जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे इचलकरंजी शहरात लाल दिवा पुन्हा येणार असल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये सुरू झालेली आहे. रवींद्र माने म्हणजेच युवा पिढीचा युथ आयकॉन असल्याची सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना गोरगरिबांची अनेक कामे केलेली आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधी आरोग्य योजना राबवून रवींद्र माने यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत तसेच रुग्णांचे वेळेवर ऑपरेशन मुंबईमध्ये केले आहे त्यामुळे या कामाची पोच पावती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. रवींद्र माने यांना विधानसभा निवडणूक न लढवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते त्यांनी त्याचे पालन केले आणि भाजपच्या नेत्याला निवडून देण्यासाठी त्यांनी मोठे पाठबळ दिलेले होते. त्यामुळे रवींद्र माने यांना लवकरच लाल दिव्याची गाडी मिळणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे.