श्रावणमास निमित्त इचलकरंजी आगारातर्फे अभिनव उपक्रम

श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात पन्नास बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत.

अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते. अक्कलकोट, जोतिबा, मार्लेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, गणपतीपुळे, नृसिंहवाडी, औदुंबर, अकरा मारुती, खिद्रापूर व रामलिंग यांचा समावेश आहे. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) सागर पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीने श्रावण मासनिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळाने प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.