12 ऑगस्टला जिल्ह्यात पुन्हा एल्गार…..

शक्तिपीठ महामार्गा विरोधात पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातील आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, शक्तीपीठ मार्ग रद्द करावा हिच आमची मागणी आहे. नागपूर-रत्नागिरी हा पर्यायी मार्ग असूनही शक्तिपीठचा घाट कशासाठी आम्ही हा महामार्ग रद्द होऊपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार आहे. सरकारने पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होते. सरकारने शेतकऱ्यांचा घात करावयाचा ठरवले आहे. सांगली- कोल्हापूरला महापुराचा कर्दनकाळ ठरणारा हा महामार्ग असणार आहे.

शक्तीपीठ मार्गासाठी सरकारचा लाडका ठेकेदार कोण? पाहिजे असा आरोप सतेज पाटील यांनी आरोप करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी १२ जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर धरण आंदोलन करण्याचा यावेळी देण्यात आला.