सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखीचा आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. परंतु अलीकडच्या काळात मात्र सांगोला तालुका विकासासाठी प्रयत्नशील आहेत. राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहुद यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार ११ ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या नोकरी महोत्सवात ६० नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. नोकरी आपल्या दारी अंतर्गत इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हर्षदा लॉन्स, मिरज रोड सांगोला या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नोकरी पूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ८ ऑगस्ट रोजी स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज गोपाळपूर, कर्मयोगी कॉलेज शेळवे, शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला, सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे तर
शनिवार १० ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला व दीपकआबा साळुंखे पाटील कॉलेज कोळा या ठिकाणी नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे.गरजू युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.