वस्त्रनगरी म्हणून जगभर ख्याती असलेल्या इचलकरंजीत कोरोना पासून वडगाव बाजार समिती येथे बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे. हा जनावरांचा बाजार पाच वर्षापर्यंत म्हणजेच कोरोना पासून बंदच आहे यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांची विक्री करणारे अनेकांची मोठी उलाढाल ठप्प झालेली आहे.
हा जनावरांचा बाजार पुन्हा एकदा सुरू करावा अशी मागणी शासन दरबारी होत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लावल्यानंतर शासनाने अनेक व्यवसायावर निर्बंध आणलेले होते त्यामुळे वडगाव बाजार समिती येथे सुरू असलेला जनावरांचा बाजार हा बंद केलेला होता तो आज अखेर गेली पाच वर्षे बंदच आहेत.कोरोनाचा काळ संपलेला असून हा बाजार पुन्हा सुरू करावा अन्यथा आंदोलनासारखे हत्यार उपसावे लागेल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.