सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या संदर्भात शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला आहे. सिटी स्कॅन, डायलेसिस व शस्त्रक्रिया विभागानंतर आता एमआरआय सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीचे इंदिरा गांधी मेमोरीयल हॉस्पिटल (आयजीएम) हे २०१६ मध्ये राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा सुरु केला.
तर आमदार राहुल आवाडे यांनीही लवकरात लवकर एमआरआय सुविधा मिळणेबाबत मागणी लावून धरली होती. माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून रुग्णालयाचे रुपडे पालटत चालले आहे. एमआरआय सुविधा नसल्याने रुग्णाना व त्याच्या नातेवाईकांना बाहेरून एमआरआय करताना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे एमआरआय सुविधा लवकर उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु होते. त्याला यश आले असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त यांच्या आदेशाने आरोग्यसेवा सहसंचालक रुग्णालये (राज्यस्तर) डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी शुक्रवारी आयजीजीएच रुग्णालयात तातडीने एमआरआय सुविधा सुरु करणेबाबतचा आदेश जारी केला आहे. चिंचवड पुणे येथील स्ना डायग्नोस्टिक यांच्याकडे हे काम आहे.
इचलकरंजी हे गोरगरीब कष्टकरी कामगारांचे शहर असल्याने याठिकाणी राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. एमआरआय आणि निटी स्कॅननी सुविधा इंदिरा गांधी नामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना मोफतपणे दिली जाणार आहे. तर बाहेरून रेफर होणान्या रुग्णांना अत्यंत माफक दरात ही सुविधा मिळणार आहे, असे आमदार राहुल आवाडे म्हणाले.