प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) नियमांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याबाबत बहुतांश शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत.
मात्र पीएम किसानचा 18 वा हप्ता येण्यापूर्वीच सरकारने योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे (). आता पीएम किसान योजनेचे लाभार्थी पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचा मोबाईल नंबर बदलू शकतात. पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना आहे आणि आत्तापर्यंत पीएम किसानचा हप्ता 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
पीएम किसानचा 18 वा हफ्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील बदलला असेल, तर तुम्ही PM किसान योजनेच्या वेबसाइट किंवा ॲपवरून नवीन नंबर लवकरात लवकर अपडेट करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कसा अपडेट करू शकता हे जाणून घ्या.
असा अपडेट करा मोबाईल नंबर
स्टेप 1: सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि फार्मर्स कॉर्नरवर जा आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 2: नवीन पेजवर, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एन्टर करा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
स्टेप 3: यानंतर तुम्हाला संमती पत्र मिळेल, ते स्वीकारल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
स्टेप 4: समोरच्या बॉक्समध्ये हा OTP टाका, त्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तळाशी स्क्रोल करा. येथे तुम्हाला एक रिकामा बॉक्स दिसेल. त्यामध्ये मोबाईल नंबर टाका आणि Get OTP पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 5: OTP टाकल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा नंबर अपडेट केला जाईल.