भिमा करणार पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप;अध्यक्ष महाडिक….

सोलापूर येथील भिमा कारखाना चालू गळीत हंगामासाठी “भीमा” सज्ज झाला असून, एकूण पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे प्रतिपादन भिमा चे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केले. गाळप हंगाम 2024/25 साठी शुक्रवार ता 9 रोजी कारखाना कार्यस्थळावर “मिल रोलर पूजन” कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी अध्यक्ष महाडिक बोलत होते.यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक, सुवर्णा मोरे यांनीही मिलचे पूजन केले. अध्यक्ष महाडिक म्हणाले, कारखाना सुरू करण्यासाठी जी महत्त्वाची व आवश्यक कामे आहेत ती झाली आहेत.

उर्वरित किरकोळ कामे सुरू आहेत. येत्या महिन्या भरात ती पूर्ण होतील. गाळप हंगामाच्या सुरुवातीला जुना प्लांट सुरू करण्यात येणार आहे, गाळप वाढल्यानंतर नवीन प्लांट सुरू करण्यात येणार आहे.दरम्यान कारखान्याला ऊस पुरवठ्या साठी 110 मोठे ट्रॅक्टर, 245 डंपिंग, 400 बैलगाड्या यांच्याशी करार झाला आहे. ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष महाडिक यांनी केले.