विट्यातील सहा वर्षांच्या बालकाचा मेंदुज्वराने मृत्यू

दोन ते तीन दिवसांपूर्वी विट्यातील एका बालकाला ताप आल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने एका खासगी रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार मेंदुज्वराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची
तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन पुण्यातील लॅबला पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये चंडीपुरा या विषाणूची लागण झाली आहे का, याचीही तपासणी होणार आहे.सोमवारी प्रशासनाला अहवाल प्राप्त होईल.

त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.विटा शहरातील एका सहा वर्षांच्या बालकाचा मेंदुज्वराने मृत्यू झाला. अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ म्हणाले, त्या बालकाचा मृत्यू मेंदुज्वराने झाला आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र त्याला चंडीपुराची लागण झाली असेल, असे वाटत नाही. जिल्ह्यात सध्या या आजाराचा एकही रुग्ण नाही.