शिवजयंतीनिमित्त आजपासून कार्यक्रम….

बार्शी तालुक्यातील पिंपळगाव (देशमुख) येथे शिवजयंतीनिमित्तशिवरत्न प्रतिष्ठान पिंपळगावच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता बालव्याख्याती साक्षी गरड यांचे व्याख्यान आहे. रविवार, १८ रोजी रात्री ८ वाजता सुरेश दौलतराव देशमुख (पिंपळगाव) यांचे व्याख्यान, त्यानंतर रात्री ९ वाजता पंढरपूरचे ह.भ.प. विठ्ठल महाराज आसबे यांचे कीर्तन होणार आहे.

सोमवार, १९ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता श्री संत माणकोजी महाराज वारकरी गुरुकुल, बळेवाडी या संस्थेतील बालविद्यार्थ्यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता ह. भ. प. सतीश कदम-पाटील महाराज आष्टेकर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता गावातून बाल वारकरी दिंडी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे.

सकाळी १० वाजता ह.भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज शिंदे, हासेगावकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री ८ वाजता ह.भ.प. रघुनाथ महाराज बिदरकर व त्यांचे सहकारी जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम करणार आहेत. कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरत्न प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.