शेअर मार्केट इज बॅक, एका दिवसात कोटीची कमाई…

अमेरिकन आणि आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचा उत्साह पाहायला मिळाला.सेन्सेक्स 820 अंकांनी वधारला, तर निफ्टी 24,350 च्या पुढे गेला. यामुळे गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजारातून सुमारे 4.42 लाख कोटी रुपयांची कमाई केली. बाजारात चौफेर विक्री पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप इंडेक्स अनुक्रमे 1.21 टक्के आणि 0.79 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बीएसईचे सर्व सेक्टोरल इंडेक्स आज हिरव्या रंगात होते.

आज दिवसाअखेर बीएसई सेन्सेक्स 819.69 अंकांनी म्हणजेच 1.04 टक्क्यांनी वाढून 79,705.91 वर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 250.50 अंकांनी म्हणजेच 1.04 टक्क्यांनी वाढून 24,367.50 वर बंद झाला.गुंतवणूकदारांनी कमावले 4.42 लाख कोटी बीएसईमधल्या लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज, 9 ऑगस्ट रोजी वाढून 450.17 लाख कोटी रुपये झालं. ते त्याच्या आधीच्या ट्रेडिंगदिवशी म्हणजेच गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी 445.75 लाख कोटी रुपये होतं. अशा रीतीने बीएसईमधल्या लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 4.42 लाख कोटी रुपयांनी वाढलं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 4.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे सर्वाधिक वाढलेले शेअर्स
बीएसई सेन्सेक्समधल्या 30पैकी 28 शेअर्समध्ये आज तेजी होती. यात महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) शेअर्समध्ये सर्वाधिक 3.08 टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल टेकचे शेअर्स 2.08 ते 2.85 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरण झालेले शेअर्स
सेन्सेक्समधले फक्त दोन शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 0.13 टक्क्यांनी, तर सन फार्माचे शेअर्स 0.01 टक्क्यांनी घसरून बंद झाले.

2332 शेअर्समध्ये तेजी
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (BSE) आज तेजीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्स्चेंजमध्ये आज एकूण 4,006 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2332 शेअर्स तेजीसह बंद झाले. 1571 शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर 103 शेअर्स सपाट बंद झाले. आजच्या व्यवहारात 247 शेअर्सनी त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 30 शेअर्सनी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.