या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचे डोळे पांढरे केले. सलग चार दिवस किंमती वधारल्या. सोने दोन हजारांनी महागले. त्यामुळे खरेदीपेक्षा सोने मोडण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात मौल्यवान धातुच्या कराविषयी कोणतेही धोरण जाहीर न झाल्याने किंमतीत दिलासा मिळाला नाही. सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले. या चार दिवसात सोने 2 हजारांनी महागले. तर शुक्रवारी सोन्यात 640 रुपयांची स्वस्ताई आली. आता 22 कॅरेट सोने 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत या महिन्यात मोठी उलथापालथ दिसली नाही. 5 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी प्रत्येकी हजारांची भर त्यात पडली. शुक्रवारी 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,300 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,092, 23 कॅरेट 85,747, 22 कॅरेट सोने 78,860 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,569 रुपये, 14 कॅरेट सोने 50,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,147 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
