सांगोल्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले हे मार्गदर्शन करणार आहेत शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीला शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, माजी गटनेते आनंदा माने, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सीमा इंगवले, युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकले विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख प्रितेश दिये, शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील, शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊ विचारविनिमय होणार आहे.विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.