यंदा गणेशोत्सव काळात डीजेला बंदी जाहीर करण्यात आले

चालूवर्षी गणेशोत्सव काळात डीजेला (DJ) बंदी राहील .शासनाच्या नियमानुसार आवाजाचे बंधन पाळावेत . मिरवणूक देखावे व इतर कार्यक्रम सादर करताना कोणत्याही जाती- धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, यासंदर्भात खबरदारी घ्यावी . शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई निश्चित केली जाईल असा इशारा देत ,सोलापूर जिल्हा आणि तालुकास्तरावर श्री गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हरित वारी , जल तारा, वृक्ष लागवड तसेच सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यातील गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे , असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी केले.

आगामी श्री गणेशोत्सव व ईद ए – मिलाद, मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने सांगोला तालुका शांतता कमिटीची बैठक नुकतीच पार पडली . यावेळी गणेश मंडळांना आवाहन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे बोलत होते. यावेळी तहसीलदार संतोष कणसे , पोलीस निरीक्षक विनोद घुगे , गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी , मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी , बांधकाम विभागाचे मुलगीर यास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पक्षाचे पदाधिकारी , विविध गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार संतोष कणसे म्हणाले की , परंपरेला फाटा देऊन सण साजरे करू नका , कायद्याच्या चौकटीत राहून कोणत्याही समाजच्या भावना दुखावणार नाहीत . अशा पद्धतीने शांततेत गणेशोत्सव सण साजरे करावेत . निवडणुकीचे राजकारण सण उत्सवात आणू नये. सांगोल्याची शांतताप्रिय परंपरा अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले . तर गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.