महिलांसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असते. सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरु करण्यात आली आहे.यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.महिलांना सशक्त,सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. २० ते ४० वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणारे उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पतीची कमाई १२,००० रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
ज्या महिला आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे त्यांना मदत करणे, हा प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीनचा उद्देश आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना केली जाणार आहे.शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, मोबाईल नंबर, विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र हे कागदपत्रे देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती https://www.india.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात येणार आहे