माढा विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहणार आहोत, त्यासाठी गावभेटी सुरु केल्याचे पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.मोडनिंब (ता.माढा) येथे गावभेट दौऱ्यावेळी ते बोलत होते.माढा तालुक्यातल्या अडल्या-नडलेल्या शेतकऱ्यांचा ऊस मी तातडीने गाळपासाठी नेला. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी टळली.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल असलेली भूमिका, माढा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, विधानसभेसाठी उभे राहणारे इच्छुक उमेदवार यासह अनेक विषयांवर त्यानी संवाद साधला.यावेळी माढ्याच्या तिढा वाढवणार नाही, तर सोडवणार आहे, असे पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले.
यावेळी दीपक सुर्वे, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील, मारुती वाघ, रमेश शिरसट आदी उपस्थित होते.