आजपासून होणार गाळे सील करण्याची मोहीम!

सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने थकबाकीदार गाळेधारकांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.मोठे आणि छोटे गाळेधारकांकडे सुमारे १२ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीदारांचा गाळा सील करण्याची मोहीम आज, दि. ५ एप्रिलपासून हाती घेतली आहे. गाळा सील करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दीडशे कुलूप खरेदी केली आहेत. सोलापूर शहरात मेजर ६४८ आणि मिनी ६५० असे १२९० गाळे आहेत.

पार्क चौक, हुतात्मा स्मृती मंदिर, कोटणीस स्मारक, लालबहादुर शॉपिंग सेंटर, जनता शॉपिंग सेंटर, पारस इस्टेट अशा २० ठिकाणी मेजर गाळे तर डाळींबी आड, २१ नंबर शाळा. अक्कलकोट पाण्याची टाकी, काँग्रेस भवनजवळ, किडवाई चौक, हिरज नाका, जयभवानी प्रशाला अशा २५ ठिकाणी मिनी गाळे आहेत.

भूमीमालमत्ता विभागाच्या वतीने या गाळेधारकांकडून भाडे गोळा केले जाते. मेजर गाळे धारकांकडे मार्च २०२३ चे ५ कोटी ५० लाख आणि थकबाकी अशी ४ कोटी ५० लाख एकूण ११ कोटीची थकबाकी आहे. तर मिनी गाळे धाराकांकडे सुमारे ३० लाखांच्या आसपास थकबाकी आहे. सर्व थकबाकी मार्च आखेर भरणे अपेक्षित होते. मात्र अनेक मेजर आणि मिनी गाळेधारकांना नोटीसा दिल्या तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ४ मार्च पासून थकबाकीदारांचे गाळे सिल करण्याची माहिम हाती घेतली आहे. गाळे सिल करण्यासाठी भूमीमालमत्ता विभागाच्यावतीने तब्बल दिडशे कुलूप खरेदी केले आहेत.