इचलकरंजी शहरात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवनचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच महिलांनी खूपच मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली.
इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी पक्षाचे भव्य कार्यालय बांधण्यात आले. राष्ट्रवादी पक्षांमध्ये दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा पवारा गटाचे कार्यालय या ठिकाणी नव्हतं. राष्ट्रवादी पक्षाचे इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी शहरात एक नवीन कार्यालय उभे केले आहे आणि याचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
अजितदादा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे स्वागत इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा जम्मू काश्मीर ते तुमच्या घरापर्यंत कार्यक्रम सुरू आहेत. हरभर तिरंगा अभियान यशस्वी करा झोकुन देऊन काम तिरंगा स्फूर्ती देतो हा इतिहास आहे उद्घाटन केलं हे प्रश्न सोडवणे हक्काचे ठिकाण बनावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी पार्कवर स्थापन झालेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चांगल्या योजना सर्व घटकासाठी आणतो.उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम महायुती आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावे.