शहराचा पाणीपुरवठा पुन्हा होणार विस्कळीत….

पंचगंगा नदीत केंदाळ साचल्याने नदीपात्राला मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या पंप हाऊसमध्ये ५४० अश्वशक्तीचे दोन उपसा पंप आहेत. त्यापैकी एक उपसा पंप अचानक बंद पडला आहे. त्यामुळे एका पंपातून पाणी उपसा केले जात आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. येत्या एक-दोन दिवसात उपसा पंप दुरुस्त केल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.