सांगोला तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा सुरू आहे. त्यांनी अनेक गावभेट व जनसंवाद दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अडीअडचणींना जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. तसेच अनेक अडचणी त्यांनी या गावभेट दौऱ्यामध्ये दूर केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या गावभेट दौऱ्याला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागलेला आहे.
रविवारी म्हणजेच 11 ऑगस्टला माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नराळे हबीसेवडी आणि सोनंद परिसरातील अनेक वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या परिसरातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या दिपकआबांच्या पुढे मांडल्या. शेतीची वीज, शिधापत्रिका, शासकीय कागदपत्रे याबाबतीत अनेक समस्या दिपकआबा समोर त्यांनी मांडल्या.
यावेळी दिपकआबांनी तात्काळ संबंधित विभागाला फोन करून सूचना देत नराळे व हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले. सोनंद गावांमध्ये माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने सवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिलांनी औक्षण करून स्वागत केले. जागेवरून त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिपकआबा विषयी असणारा आदर आणखीनच वाढलेला आहे. तसेच त्यांच्या दौऱ्याचे चांगलेच कौतुक देखील होऊ लागलेले आहे.