कोल्हापूरात ऑलिंम्‍पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांची 21 ऑगस्टला भव्य मिरवणूक

कांबळवाडी ता. राधानगरीचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टु स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक प्राप्त केल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी प्रथमच गावी येत आहे. कोल्हापूर पासून कांबळवाडीपर्यंत त्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीसाठी भोगावती साखर कारखान्याने ही पुढाकार घेतला आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कावळा नाका येथे ताराराणी चौकात समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने स्वप्नीलचे जल्लोषी स्वागत होईल. तेथूनच मिरवणूकीस प्रारंभ होईल.