आगामी 2024 विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा अर्ज मा. संजयदादा कांबळे यांनी दाखल केलेला आहे. देवांग कोष्टी समाज पेठ वडगांव ची जनरल मिटिंग काल रात्री पार पडली. यावेळी वडगांव समाजाचे अध्यक्ष श्री सचिन लोले यांनी सांगितले की, आपले इचलकरंजीचे समाज बांधव व चौंडेश्वरी सुत गिरणीचे विद्यमान चेअरमन मा. श्री. संजय दादा कांबळे हे विधानसभा निवडणुकीस उभे राहणार आहेत. तसेच त्यांनी पक्षाकडे निवडणूक तिकीट मागितले आहे.
तरी आपल्या पेठ वडगांव समाजास मा. श्री. संजयदादा यांचे नेहमी सहकार्य असते. तसेच आपला विणकर बांधव विधानसभा सदस्य म्हणून पाठवायची जबाबदारी आता आपल्या सर्वांची असुन मा. श्री. संजयदादा कांबळे यांना आपण जाहिर पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला व मा. श्री. संजयदादा कांबळे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
आता थांबायचं नाही
कोणाला घाबरायचं नाही
देवांग कोष्टी समाज पेठ वडगांव