आरोग्य सेवा कोलमडणार! १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप….

कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA)देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळं देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

आयएमएनं एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.