वीकेंड आला आहे त्यामुळे सर्वजण ऑलरेडी वीकेंड मूडमध्ये गेले असून सुट्ट्यांचं मस्त प्लॅनिंग करत आहेत. मात्र काहीजण घरीच बसून मस्त चील आणि आराम करतात. त्यामुळे तुमचाही घरी बसून मस्त चील करण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. तुम्ही ओटीटीवर काही खास मूव्ही पाहत आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत, कुटुंबासोबत घरी आनंद घेऊ शकतात. आता वीकेंडला कोणते मूव्ही पहावे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुमच्यासाठी खास मूव्हींची लिस्ट इथे आहे.
या वीकेंडला तुम्ही राम चरणच्या अॅक्शन-पॅक्ड ‘गेम चेंजर’पासून ते सान्या मल्होत्राच्या ‘मीसेस’पर्यंत अनेक मूव्हीचा आनंद घेऊ शकता. ओटीटीवर नुकतेच रिलीज झालेले कोणकोणते सिनेमे आहेत याची लिस्ट पाहूया.

गेम चेंजर: राम चरणचा ‘गेम चेंजर’ मूव्ही ओटीटीवर रिलीज होत आहे. राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर शंकर दिग्दर्शित तेलुगू अॅक्शन थ्रिलर, ‘गेम चेंजर’ 10 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आता प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रदर्शित होत आहे. ज्याचे स्ट्रीमिंग 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
मीसेस: सान्या मल्होत्रा स्टारर आरती कडव दिग्दर्शित हा चित्रपट आहे. एक कुशल नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका जिला लग्नानंतर स्वतःला व्यक्त करणे कठीण जाते. या चित्रपटात कंवलजीत सिंग आणि निशांत दहिया देखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत आणि हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी Zee5 वर रिलीज होणार आहे.

बडा नाम करेंगे : सूरज बडजात्या पहिल्या वेब सिरीज ‘बडा नाम करेंगे’, द्वारे डिजिटल क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ही कथा ऋषभ आणि सुरभी या जोडप्याची आहे, जे एका विवाहात अडकले आहेत आणि त्यांच्या नात्यात अनपेक्षित अडचणी येतात कारण त्यांचे लपलेले भूतकाळ उघडकीस येतात. त्यांच्या नात्यातील बंधातून मार्ग काढताना, ते वैयक्तिक आकांक्षा आणि सामाजिक अपेक्षांमध्ये अडकलेले गोष्टींवर ही कथा आहे. रितिक घनशानी आणि आयशा कडूसकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ही सिरिज 7 फेब्रुवारीला सोनीलिव्हवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे वीकेंडला तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

डाकू महाराज: ‘डाकू महाराज’मध्ये नंदमुरी बालकृष्ण, श्रद्धा श्रीनाथ, प्रज्ञा जयस्वाल, बॉबी देओल, ऋषी, चांदनी चौधरी, वेदा अग्रवाल आणि शाईन टॉम चाको यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकाराचा उत्कृष्ट अभिनय आहे. दिग्दर्शक बॉबी कोल्ली दिग्दर्शित या चित्रपटाने ‘डाकू महाराज’ 9 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

द ग्रेटेस्ट रायव्हलरी: इंडिया विरुद्ध पाकिस्तान: ही डॉक्युमेंट्री क्रिकेटमधील सर्वात मोठ्या रायव्हलरीवर आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याविषयी यामध्ये दाखवण्यात आलं आहे. ही डॉक्युमेंट्री 7 फेब्रुवारीला ओटीटीवर रिलीज होत आहे. तुम्ही ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा वीकेंडही चीलमध्ये जाईल.
