सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले? मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे असं संभाजी भिडे म्हणाले होते.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार भडकले. संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी केला. राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. ंएकनाथ शिंदेना मराठा आरक्षण द्यायचं आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असं काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.