राजापूर ता. संगोला जि. सोलापूर येथील प्राथमिक आश्रमशाळा राजापूर ता. सांगोला येथील कर्मचारी प्रकाश पट्टेबापू तोडकरी (कमाठी) यांचे दि. १५ ऑगस्ट २०२४ पासून कालबध्द पदोन्नती मिळणे बाबत आमरण उपोषण सुरू होते. प्राथमिक आश्रमशाळा राजापूर प्रशालेचे प्रकाश पट्टेबापू तोडकरी यांचा कालबध्द पदोन्नती चा प्रस्ताव सहाय्यक संचालक कार्यालय येथे सादर झालेने सदरचे उपोषण पाचव्या दिवशी मागे घेणेत आले. सदर प्रस्तावासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याने सदरचे उपोषण मागे घेतल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
उपोषणकर्ते यांना योग्य तो न्याय मिळणे कामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. दीपकआबा साळुंखे पाटील व स्वराज्य शिक्षक संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, जिल्हाध्यक्ष सुभाष सेडबाळ, सिताराम लवटे तसेच मा. उपसचिव, मा. प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक संचालक, श्रीमती मनिषा फुले, सांगोला पोलिस स्टेशन चे स. पो. नि. पवार साहेब व सर्व ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले व प्रकाश तोडकरी यांचा कालबध्द पदोन्नती चा प्रस्ताव सहाय्यक संचालक कार्यालय येथे सादर झालेने सदरचे उपोषण पाचव्या दिवशी मागे घेणेत आले.