बदलत्या वातावरणाचा साथीच्या आजारात वाढ! रूग्णांची गर्दी….

गेल्या महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे विविध नद्यांना पूर आले तर बहुसंख्य धरणे भरली गेली. त्यानंतर पावसाने थोडी फार उसंत घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हाबरोबर पावसानेही जोरदार बॅटींग सुरू केली आहे. अशा विचित्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ऊन पावसाचा सुरू असलेला खेळ आणि त्यामुळे वातावरणामध्ये झालेला बदल तसेच शहरामध्ये विविध भागात, गल्लीमध्ये साचलेला कचरा याचा विपरित परिणाम आरोग्यावर होताना दिसून येत आहे.

ताप, सर्दी, खोकला याबरोबरच डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजाराचे रूग्ण वाढत चालले आहेत. शहर परिसरातील लहान-मोठ्या खासगी रूग्णालयामध्ये रूग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. तेव्हा नागरिकांनी खबरदारी बाळगावी. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने शहरातील साफ-सफाई युध्द पातळीवर राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहराच्या विविध भागात वेळोवेळी गटारीची साफ-सफाई व कचरा उठाव केला जात नाही. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून कचरा कुजत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. या सर्व बाबींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबरच डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार नागरिकांमध्ये वाढत असल्याचे चित्र आहे. शहर- परिसरातील लहान – मोठे खासगी रूग्णालयात रूग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने शहरातील साफ-सफाई युध्द पातळीवर राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.