महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ खोतवाडी परिसरात भव्य पदयात्रा

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ खोतवाडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या पदयात्रेतून स्थानिक नागरिकांनी मदन कारंडे यांच्यावरील विश्वास आणि समर्थन व्यक्त केले.

पदयात्रेदरम्यान जनतेत उत्साह दिसून आला आणि परिवर्तनाची आशा जागृत झाली. आपल्यासोबत परिवर्तनाची ही लढाई लढून इचलकरंजीच्या विकासाचे स्वप्न साकार करू असे आश्वासन देत मदन कारंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले. या भव्य पदयात्रेने प्रचाराला नवा जोम मिळवून दिला आणि जनतेच्या विश्वासाचे बळ मदन कारंडे यांना मिळाले.