इचलकरंजीचा आठवडी बाजार भरणार उद्या बुधवारी

आज मंगळवार सात मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान तसेच मंगळवार म्हणजेच चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी ही शांततेत पार पाडण्यासाठी ज्या गावांमध्ये मतदान व मतमोजणी दिवशी आठवडी बाजार भरतो त्या काळामध्ये सदर दिवशी भरणारे बाजार, जत्रा बंद ठेवण्यास किंवा पुढे ढकलन्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

इचलकरंजी शहरातील आठवडी बाजारातील विक्रेते व व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आलेले आहे की, इचलकरंजी हद्दीतील अहिल्याबाई होळकर, विकली मार्केट, जवाहर नगर पाण्याच्या टाकी जवळ आणि आण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोरील मार्केट या ठिकाणचे सर्व आठवडी बाजार आज मंगळवार 7 मे रोजी बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि हा आठवडा बाजार बुधवारी म्हणजेच उद्या 8 मे रोजी भरविण्यात येणार आहे.