धारावीतील मशिद प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबईच्या धारावीत आज तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलंय. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला आणि परिणामी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या परिस्थिति आटोक्यात आली असली तरी परिसरात तनावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटतांना बघायला मिळाले आहे.

परिणामी या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, दोन समाज समोरासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, हिंसा होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजातील नेत्यांनी किंवा आंदोलन करणाऱ्यांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केलाय. याच रस्त्याने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जात असल्याने ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला होता.