NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर इथे चेक करा रिझल्ट

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NBEMS ची अधिकृत वेबसाइट, natboard.edu.in वर जाऊन विद्यार्थी निकाल तपासू शकतात.NEET PG 2024 साठी बसलेल्या उमेदवारांचे मार्कशीट 30 ऑगस्ट 2024 रोजी nbe.edu.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे. या निकालात काही शंका असल्यास उमेदवार 011-45593000 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

NEET PG परीक्षेचा निकाल कसा तपासायचा?

स्टेप 1: सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत साइट nbe.edu.in वर जावे.

स्टेप 2: यानंतर, होमपेजवर NEET PG निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आता NEET-PG निकालाची PDF फाइल उमेदवारासमोर दिसेल.

स्टेप 4: यानंतर उमेदवारांनी ही फाईल डाउनलोड करावी.

स्टेप 5: नंतर उमेदवार या फाईलमध्ये त्यांचा रोल नंबर शोधावा.

स्टेप 6: उमेदवार त्याची प्रिंट देखील घेऊ शकतात.