मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडत असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत.
या गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 2 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ठाण्यात 19 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मुंबईसह ठाण्यात सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान थरावरुन कोसळून गोविंदा जखमी होतात. त्यामुळे या गोविंदांसाठी आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात आली होती.
यंदाही थरावरुन कोसळून काही गोविंदा जखमी झाले. या गोविंदांवर केईएम, नायर, शीव, कूपर आणि इतर प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईत एकूण 238 जखमी गोविंदाची नोंद करण्यात आली आहे. यातील 32 गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील दोन जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.