सांगोला तालुक्यात एल. पी. जी गॅस संदर्भात अनधिकृत वापराबाबतची तपासणी करणेसाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री समाधान घुटूकडे व तहसिलदार सांगोला श्री संतोष कणसे यांनी दिली. सांगोला तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्री समाधान घुटूकडे यांच्या अधिपत्याखाली एल.पी.जी गॅस संदर्भात अनियमितताना पायबंध घालण्याच्या हेतूने अनधिकृत वापराबाबतची तपासणी करणेसाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
तरी चहा टपरी, वडापाव टपरी, चायनीज ” टपरी, हॉटेल्स इत्यादी ठिकाणाची पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. सदर ठिकाणी अनधिकृतपणे घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास असल्यास संबंधिताविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला जाईल व मुद्देमाल जप्त केला जाईल. तरी सांगोला तालुक्यातील टपरी, हॉटेल धारकांनी घरगुती सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी करण्यात येवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री समाधान घुटूकडे व तहसिलदार सांगोला श्री संतोष कणसे यांनी केले आहे.