चौंडेश्वरी पतसंस्थेच्यावतीने दीपावली भेट कार्यक्रम संपन्न

चौंडेश्वरी क्रेडिट को- ऑप. सोसायटी, सांगोला यांचे वतीने यावर्षी सभासदांना दीपावली भेट म्हणून प्रत्येक सभासदास २ किलो साखर भेट वाटप कार्यक्रम शनिवारी विठ्ठल मंदिर, कोष्टी गल्ली येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ सभासद रमेश कांबळे यांच्या शुभहस्ते श्री चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित सभासदांचे व संचालकांचे अनिल लाटणे यांनी स्वागत केले.

संस्थेचे चेअरमन मधुकर कांबळे यांनी पतसंस्थेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. साखर वाटप कार्यक्रम सर्व संचालकांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदर समारंभास व्हा. चेअरमन संजय लाटणे, संचालक राजकुमार दौडे, अवधूत कुमठेकर, संजय कांबळे, विजय चोथे, शिवदास खडतरे, कुलदीप बाबर व संस्थेचे सभासद भास्कर सपाटे, नामदेव कांबळे, अमर तारळेकर, हरिभाऊ बाबर, दीपक सपाटे, शकील शेख, शेषमल आमने, प्रमोद टेके, प्रमोद कलढोने, सौ. बोत्रे, सपाटे आजी उपस्थित होते. सर्व सभासदांनी ११ नोव्हेंबर पर्यंत संस्था कार्यालयातून साखर घेऊन जाण्याचे संस्था सचिव सौ. शितल डोईफोडे यांनी आवाहन केले. आभार प्रदर्शन माजी चेअरमन राजकुमार दौडे यांनी केले.