सप्टेंबर महिना चालू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियमांत बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही बदल झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार मिळून एकूण 15 दिवस बँका बंद (Bank Holidays in September 2024) असतील.
सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकांशी संबंधित काही काम करायचे असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन करायला हवे.
बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार?
1 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)
4 सप्टेंबर: श्रीमंता शंकरदेव यांची तिरुभव तिथी (असाममधील बँका बंद)
7 सप्टेंबर: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गोवा)
8 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)
14 सप्टेंबर: दुसरा शनिवार, (संपूर्ण देशातील बँका बंद)
15 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)
16 सप्टेंबर: इद ए मिलाद (गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, जवळजवळ संपूर्ण भारतात सुट्टी)
17 सप्टेंबर: मिलाद-उन-नबी (सिक्कीम, छत्तीसगडच्या बँका बंद)
18 सप्टेंबर: पंग-लहबसोल (सिक्कीमच्या बँका बंद)
20 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगरच्या बँका बंद)
22 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)
21 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवस (केरळमधील बँका बंद)
23 सप्टेंबर: महाराजा हरिसिंह जन्मदिवस (जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद)
28 सप्टेंबर : चौथा शनिवार (संपूर्ण देशातील बँका बंद)
29 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण भारतातील बँका बंद)