इराण आणि इस्रायल युद्धाचा (Iran Israel War) परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या युद्धामुळं तेलाच्या किमंतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळं भारतात देखील पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुरुवातीला 2 टक्के किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर लगेच काही दिवसातच कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आपण आखाती देशांसह रशियाकडून देखील कच्चे तेल आयात करतो. त्यामुळं भारतात येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातसह जगभरात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याची माहिती एता अहवालात देण्यात आली होती.
यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. पण आता अशातच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या जरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.