जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नवनवीन योजनांची घोषणा करण्यात येत आहे. अशातच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या ‘अभय योजने’च्या घोषणेनंतर ही योजना आता अंमलात येणार आहेत.
येत्या 1 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात येणार असून या योजनेमुळे वीजबिल थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेद्वारे वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वीजबिल थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.राज्यात वीजबिल थकल्यामुळे अनेकांचं वीज कनेक्शन महावितरणकडून कायमस्वरुपी कट करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 38 लाख घरगुती आणि व्यवसायिक, औद्योगिक वीजबिल थकबाकीदार आहेत. विशेषत: त्यांच्यासाठीच सरकारने ही योजना आणलीयं. या योजनेद्वारे थकबाकीदारांच्या वीजबिलाचे व्याज आणि विलंब आकार शुल्क एकूण 1788 रुपये माफ करण्यात येणार आहेत. विजबील थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहे.
‘महावितरण अभय योजना’ आहे तरी काय?
वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचे पाऊल-ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजना सुरु-वीजबिलावरील व्याज, विलंब दंड माफ करण्यात येणार-योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024-मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरुन उर्वरित 6 हप्त्यात भरण्याची सवलत-एक रक्कमी थकबाकीदारांना 10 टक्के सवलत तर व्यावसायिकांना 5 टक्के सवलत
दरम्यान, 1 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना असून थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नसणार आहे.
तसेच मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरुन ऊर्वरित 70 टक्के रक्कम 6 हफ्त्यात भरण्याची सवलत ग्राहकांना मिळणार आहे. तर जे घरगुती, व्यावसायिक, लघुदाब ग्राहक, एक रकमी थकित बिल भरतील त्यांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे आणि उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना 5 टक्के सवलत मिळणार आहे.