आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे सरकार अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
आंदोलन करुन न्याय मिळवण्यासाठी मराठा समाज तयार झाला आहे. आज होणारा रास्तारोको शांततेत करायचं आहे. राज्यात जिथे जिथे शक्य आहे तिथे त्यांनी ११ ते १ यावेळेतच रास्ता रोको करा. त्यानंतर आंदोलन नका करु. उद्यापासून रास्तारोको होणार नाहीत. त्यानंतर धरणे आंदोलन होणार आहे. प्रत्येक गावात, शहरात धरणे आंदोलन करायचं आहे, असं ते म्हणाले.
उद्यापासून रास्तारोको होणार नाही.
उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मला समाज बांधवांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांना आंतरवाली सराटीमध्ये यावं. शक्यतो यावच, कारण उद्या मी निर्णायक भूमिका घेणार आहे. शेवटची आणि निर्णायक भूमिका असेल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.माझा डाव सरकारला हाणून पाडायचा आहे, त्यामुळे आम्ही फक्त डाव बदलला आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.