इचलकरंजीत शुक्रवारपासून फेस्टिवलचे आयोजन

सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. इचलकरंजी मधील देखील गणेशोत्सव खूपच प्रसिद्ध आहे. प्रत्येक मंडळांनी आपापल्या मंडळामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे. अशातच इचलकरंजी पंचक्रोशीत गणेशोत्सव म्हटले की इचलकरंजीचे फेस्टिवल हे सर्वांच्या लक्षात येते.

आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 30 वर्षांपासून इचलकरंजी फेस्टिवलचे आयोजन केले जात आहे.

इचलकरंजी फेस्टिवल 2024 च्या निमित्ताने यंदा इचलकरंजीसह पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. 13 ते 16 सप्टेंबर असे चार दिवस श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृह येथे विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती इचलकरंजी फेस्टिवलच्या संयोजिका सौ. मौसमी आवाडे यांनी दिलेली आहे.