सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये महाविद्यालय स्तरावरील अविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड दरवर्षी विद्यापीठ स्तरावर अविष्कार स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी होत असतात. या स्पर्धे साठी विद्यार्थी निवड करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धे साठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादरीकरण पोस्टरच्या माध्यमातून केले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाविषयी उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली.

तसेच या प्रकल्पामुळे होणारे सामाजिक फायदे विशद केले. परीक्षकांनी मेडिसिन व फार्मसी विभागातून एम. फार्मसीची किरण पाटील, देवता शिंदे, वैष्णवी चव्हाण, प्रेरणा पंचवाघ, अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या रसिका कदम, मुस्कान तांबोळी, ऋतुजा भोसले यांची निवड पुढील विद्यापीठ स्तरावरील पुणे येथे होणाऱ्या अविष्कार स्पर्धेसाठी केली. या विद्यार्थ्यांना डॉ. एन. ए. तांबोळी, डॉ. ए. एम. तांबोळी, प्रा.ए.डी. माळी, प्रा. एम. आय. मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले. तर डॉ.एम. एस. पाटील, प्रा.एस.पी. जोकार, प्रा. एस. एस. काळे, डॉ. एम.जी. शिंदे हे परीक्षक लाभले. अविष्कार समन्वयक म्हणून प्रा. ए.डी. माळी यांनी काम पाहिले.