सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सहकारी व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आज जनता हाच आपला पक्ष; असे सांगत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचे असलेल्या सर्व पदांचा देखील राजीनामा दिला आहे. साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीमुळे आमदार शहाजी बापू पाटील अडचणीत आले आहेत.
मागील पाच वर्षांमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांना मदत केली आहे. त्यापूर्वी शेकापला चार वेळा मदत केली आहे. (Sangola) त्यामुळे आता शहाजी बापू पाटील व शेकापने यांनी आपल्याला मदत करावी असे आवाहनही साळुंखे पाटील यांनी केले आहे. सांगोल्यामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी दुहेरी लढत अपेक्षित असतानाच माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी महायुतीला मोठा धक्का देत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. साळुंखे यांच्या उमेदवारीमुळे सांगोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.