इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढाला राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत विजेतेपद

नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढा प्रशालेच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले. या संघाने अंतिम सामन्यात मुंबई विभागाचा १९-६ असा विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. कर्णधार प्रज्ञा माने, आकांक्षा मोरे, रिया क्षीरसागर श्रेया माने निकिता चेळेकर, प्राजक्ता सावंत स्नेहल दांडगे साक्षी महामुनी, अर्पिता ठोंबरे, ऐश्वर्या जाधव, श्रेया शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

या घवघवीत यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम यांनी खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी सतीश सावंत, संगीता ताड उपस्थित होते. या सर्व यशस्वी खेळाडूंना हँडबॉलचा राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र पोलीस नवनाथ लोहार क्रीडा मार्गदर्शक दीपक शिनगारे, ज्ञानेश्वर मेटकरी, धनंजय यादव, अमित जावळे श्रीकांत काळुंगे, आण्णा वाकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजु काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी – अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.