सध्या आष्टा नगरपालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू असल्याने गेल्या अनेक वर्षात आष्टा शहर विकास आघाडीचा एकही नेता नगरपालिकेकडे फिरकला नव्हता यामुळे नगरसेवक व नगर पालिकेचा काही काळासाठी काही संबंध नसल्याचे चित्र दिसून आले. म्हणूनच आष्टा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रांमध्ये विरोधकांनी आपले पाळेमुळे भक्कम केली असल्याची नागरिकांतून चर्चा होत आहे. आष्टात विकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक विकास कामांचा नारळ विरोधकांनी याआधी फोडला आहे.
अशा शहरात सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीला आता पूर्णविराम मिळाला असून आष्ट्यात विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच नेते, माजी नगरसेवक, कार्यकर्ते कामाला लागणार आहेत असे दिसून येत आहे. आघाडीचे नेते झुंजारराव पाटील यांनी आष्टा नगरपालिकेत भेट देऊन पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली आहे.