इस्लामपूरच्यावतीने आष्टा येथील उपबाजारात हळद सौद्यांचा शुभारंभ झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वैभव शिंदे, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, विराज शिंदे, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम जाधव यांच्या हस्ते शुभारंभ झाला.यावेळी उपसभापती शिवाजी आपुगडे, बाजार समिती संचालक जितेंद्र पाटील,डॉ. अशोक पाटील, व्यापारी प्रतिनिधी बाळासाहेब इंगळे, डॉ. विश्वजा शिंदे, माजी नगरसेवक अर्जुन माने, दत्तात्रय मस्के प्रमुख उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नातून आष्टा येथे इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू करण्यात आला. आष्टा व परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली हळद सांगली येथे मार्केट यार्डात घेऊन जावे लागते त्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याने गेली दहा वर्षपूर्वी आष्टा येथील उपबाजारात हळदीचे सौदे सुरु केले. हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आष्टा येथील उपबाजार आवारात झालेल्या आजच्या सौद्यात हळदीचा दर एक नंबर हळदीस १८००० ते २१०००, नंबर दोनसाठी १४००० ते १७०००, कणी १२००० ते १३५००, अंगठी गठ्ठा १२००० ते १४१०० तर सोरा २७००० ते २९००० असे दर मिळाले आहेत.