इचलकरंजीत पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाला उस्फूर्त प्रतिसाद! 9000 मूर्तींचे विसर्जन

सगळीकडेच पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम कुंडांची सोय करण्यात येते. या पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाला इचलकरंजी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहरवासीयांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाचे आव्हान केले होते. त्यानुसार वार्डनिहाय 71 विसर्जन कुंड ठेवण्यात आलेले होते.

त्याचबरोबर शहापूर खण येथे विसर्जनाची सोय देखील करण्यात आलेली होती. 9010 गणेश मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी केले. तर पंधरा टन निर्माल्य महानगरपालिकेच्या वतीने गोळा करण्यात आलेले आहे. या पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला शहरवासीयांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.