इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ……

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे आणि सभा, मेळावे तसेच अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष यांच्या हालचाली गतिमान झालेल्या सध्याचे चित्र दिसत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे तर शिरोळ शिवसेनेकडे हे मतदारसंघ निश्चित झाल्याचे समजून येत आहे. भारतीय जनता पार्टीकडे इचलकरंजी, दक्षिण कोल्हापूर तर भाजपाने उत्तर कोल्हापूर या मतदारसंघावर दावा केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ हे चार मतदारसंघ मिळालेच पाहिजेत असा आग्रह धरत इचलकरंजीवरही दावा केलेला आहे. पण इचलकरंजी भाजपाकडे जाईल असे काल रात्री उशिरा कळालेले आहे.

करवीर किंवा हातकणंगले यापैकी जनसुराज्य शक्तीने करवीरसाठी अधिक प्रतिष्ठा लावल्याचे समजून आलेले आहेत. इचलकरंजी भाजपाकडे जाणार हे मात्र जवळपास पक्के झालेले आहे असे सांगण्यात येत आहे.