9 किंवा 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणेसाठी आणखी 20 लागतील, अशी शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा सहसा 45 दिवसांआधी होते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपतेय.म्हणजे 26 नोव्हेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी आवश्यक आहे. त्यामुळं इथून 45 दिवस आधी दोन चार दिवस मागे पुढे जरी झाले तरी 9 किंवा 10 ऑक्टोबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बघितला तर, यावेळी महिनाभर निवडणूक उशीरा होतेय. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत घेतल्या होत्या. यावेळी हरियाणाच्या निवडणुका घोषित झाल्या असून प्रचारही सुरु झाला. पण महाराष्ट्राची निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही.2019 मध्ये 21 सप्टेंबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झाली होती. 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात सर्व 288 जागांवर मतदान झालं आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली.

यावेळी समजा 9 किंवा 10 ऑक्टोबरला निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेवून जर आचारसंहिता किंवा निवडणूक घोषित केली. तर शक्यता अशी आहे की 2 टप्प्यात मतदान, 10 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर अशा 2 दिवसांच्या अंतरानं मतदान होऊ शकते आणि निकाल 3 किंवा 4 दिवसाने म्हणजे 15 किंवा 16 नोव्हेंबरला लागू शकतो.