सकाळी नाश्त्यात बनवा ‘हे’ 5 आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ, चवीसोबतच मिळेल पोषणही

नाश्ता हा दिवसातला सगळ्यात पहिला आहार असतो. दिवसाची सुरूवात करताना नाश्ता हा पोटभर करायचा असतो आणि त्याचवेळी पौष्टिक असणं फार महत्वाचं आहे. अशातच आपण रोज असा नाश्ता करावा जो आपल्या शरीराला आवश्यक सर्व पोषण त्यात मिळतील. त्यातच रोज नाश्ताला काय बनवायचं हे प्रत्येक महिला रोजचा प्रश्न पडत असतो. त्यात घरातील मंडळी हे दररोज नाश्त्यात काहीतरी नवीन असेल तर सगळ्यांनाच ते खायला खूप आवडतं. त्यात घरच्यांना काहीतरी पौष्टिक खाऊ घालावं असं महिलांना वाटत असतं. तर आजच्या या लेखात आपण अशाच पौष्टिक व भरपुर पोषण असलेल्या आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ नाश्त्यांचे पदार्थ जाणून घेऊयात…

1- जर तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल आणि ते पदार्थ चविष्टही हवे असेल, तर ओट्स विथ फ्रूट्स ॲंड सीड्स पासून तयार नाश्ता तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ते बनवण्यासाठी ओट्स 5-7 मिनिटे दुधात उकळवा. ते थंड झाल्यावर त्यावर बारीक तुकडे केलेली फळे, चिया/अळशीचे बिया आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध देखील त्यात टाकू शकता. हा पौष्टिकतेने समृद्ध नाश्ता पचनापासून ते ऊर्जा वाढवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खूप चांगला आहे.

2- ग्रीक दही पार्फे हा पदार्थ नाश्त्यात खाण्यासाठी एक अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. उन्हाळ्यात ग्रीक दही पार्फे हा पदार्थ खाणे आणखी फायदेशीर आहे. यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये दह्याचा थर टाका. नंतर ग्रॅनोला, नंतर फळे आणि वरून त्यावर मध आणि सीड्स टाका. त्यानंतर हे 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व्ह करा. उच्च प्रथिने, हेल्दी फॅट आणि फायबरने भरलेला हा नाश्ता चवीलाही अद्भुत आहे.

4- पॅनकेक्स फक्त मुलांनाच आवडत नाहीत तर मोठ्यांनाही आवडतात. ते हेल्दी पद्धतीने बनवण्यासाठी तुम्ही त्यात बेसन वापरू शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला बेसनाच्या पिठात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मिक्स करा आणि त्यात हळद, मीठ आणि जिरे टाकूल चांगले मिक्स करा. थोडे तेल लावून ते तव्यावर टाकून शिजवून दोन्ही बाजुंनी चांगले भाजा. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कमी कार्ब आणि हेल्दी फॅटचा नाश्ता चांगला आहे.

5- मल्टीग्रेन टोस्टवर बनवलेला अ‍ॅव्होकॅडो देखील खूप चविष्ट असतो. हा नाश्ता तयार करण्यासही कमी वेळ लागतो. यासाठी, तुम्ही फक्त अ‍ॅव्होकॅडो मॅश करा आणि त्यात मीठ, लिंबू आणि मिरची टाका. आता हे मिश्रण टोस्टवर पसरवा. त्यात हेल्दी फॅट असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.