सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे.सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय.
मात्र, जानेवारी ते जून या कालावधी मधील एआयसीपीआयची आकडेवारी पाहिली असता आता या भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणे जवळपास निश्चित आहे.म्हणजेच हा भत्ता आता 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मार्च 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केला होता.
ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली होती.यामुळे मार्च महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित नोकरदार मंडळीला देण्यात आली होती. आता मात्र हा महागाई भत्ता 53 टक्के एवढा होणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
परंतु ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर 25 सप्टेंबर 2024 ला होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 53% करण्याला मान्यता दिली जाणार आहे.