अनेक लोक गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाहीत. ते सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधतात. जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो. जर तुम्ही देखील अशी योजना शोधत असाल, तर आवर्ती ठेव म्हणजेच आरडी (RD) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
RD वर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो? जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल सविस्तर माहिची जाणून घेऊयात. जर तुम्हाला कमी गुंतवणूक करुन त्यावर चांगले व्याज मिळवायचे असेल, तर तुमच्याकडे SIP आणि RD सारखे पर्याय आहेत. दोन्हीमध्ये, तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करून व्याजाचा लाभ घेऊ शकता. परंतू, एसआयपी ही हमी परतावा असलेली योजना नाही. कारण ती बाजाराशी जोडलेली आहे.
SIP मध्ये सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. परंतू, तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही, म्हणून ते सुरक्षित गुंतवणूक शोधतात जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो. दरम्यान, आवर्ती ठेव म्हणजेच आरडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमधून RD सुविधेचा लाभ घेऊ शकता. बँकांमध्ये, RD 1 वर्ष ते 10 वर्षांसाठी सुरू करता येते. तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला RD मध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्हाला बँकांमध्येही आरडीवर कमी वेळेत चांगले व्याज मिळू शकते. 1 ते 5 वर्षांसाठी RD वर किती व्याज मिळत आहे हे जाणून घेऊयात.
एका वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?
SBI – 6.80 टक्के
HDFC – 6.60 टक्के
ICICI – 6.70 टक्के
कोटक महिंद्रा – 7.10 टक्के
दोन वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?
SBI – 7.00 टक्के
HDFC – 7.00 टक्के
ICICI – 7.10 टक्के
कोटक महिंद्रा – 7.15 टक्के
तीन वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?
SBI – 6.50 टक्के
HDFC – 7.00 टक्के
ICICI – 7.00 टक्के
कोटक महिंद्रा – 7.00 टक्के
पाच वर्षाच्या आरडीवर कोणत्या बँकेत किती मिळते व्याज?
SBI – 6.50 टक्के
HDFC – 7.00 टक्के
ICICI – 7.00 टक्के
कोटक महिंद्रा – 6.20 टक्के
पोस्ट ऑफिस – 6.70 टक्के
कोणत्या बँकेत मिळणार जास्त फायदा?
तुम्ही एक वर्ष किंवा दोन वर्षांसाठी आरडी केल्यास, तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेत चांगले व्याज मिळेल. येथे एका वर्षाच्या आरडीवर 7.10 टक्के व्याज आणि दोन वर्षांच्या आरडीवर 7.15 टक्के व्याज उपलब्ध आहे. तर 3 वर्षात RD, HDFC, ICICI आणि Kotak Mahindra यांना 7.00 टक्के दराने समान व्याज मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठेही आरडी करुन घेऊ शकता. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेत 5 वर्षांसाठी आरडी करुन घेण्याचा फायदा आहे. येथे 5 वर्षांच्या RD वर 7.00 टक्के दराने व्याज देखील मिळेल.